भावगंगा - त्रिकालसंध्या करा रं
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
चला रं उठा रं त्रिकालसंध्या करा रं
दिली जयानं शक्ती, शान्ती, स्मृती तयाला स्मरा रं ॥धृ॥
पहाट झाली उठा रं हात आपुलं बघा रं
पाय लागता भू-मातेला वंदन तिजला करा रं ॥१॥
वसे लक्ष्मी बोटात ज्ञानदेवता हातात
भक्तीमधले मर्म उमगता माधव येतो मुठीत ॥२॥
आंघोळीला चला रं अंग आपुलं भिजवा रं
'हरहरगंगे’, म्हणता म्हणता मन बी अपुलं धुवा रं ॥३॥
चंद्रभागा ही पाण्यात काशी, पंढरी देहात
गंगा-यमुना-सरस्वतीचं प्रयाग आलं घरात ॥४॥
चला शिदोरी सोडा रं ‘सहनाबवतु’ म्हणा रं
भूक शमवितो या विश्वाची त्याला आठवुन जेवा रं ॥५॥
कोण राहतो देहात? कोण झोपवी क्षणात?
कोण फिरवितो कर मायेचा आपण असता झोपेत ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP