भावगंगा - बनले कार्य तुझे सम्राट
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
नाही घातली कंठी, माळा, कुणा दिला ना पाठ
बनले कार्य तुझे सम्राट ॥धृ॥
प्राणिमात्र तुज आप्त वाटती
बंधन मधले एकच; प्रीती!
समता, ममता गाठ बांधली; घडला अभिनव थाट ॥१॥
अगदी अद्भुत रीत राहिली
दृढतर वटवृक्षापरि जमली
छाया, शान्ती, ऊब, निवारा, सर्वांना वहिवाट ॥२॥
भीतिभरित कधी वादळ उठते
प्रीती, रीती हलवित सुटते
दीपस्तंभ तू सागरातला! नित दाखविसी वाट ॥३॥
प्रभु कार्यास्तव तव पद चालती
वाणी, बुद्धी, तव कर हलती
अयाचका! तू विश्व जिंकिले! मोद सोडि ना पाठ ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP