भावगंगा - प्रिय दादा जन्मभूमी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
पंचप्राणाहुनि आम्हा प्रिय दादा जन्मभूमी
दीपस्तंभ या जगाची पुण्य पांडुरंग भूमी ॥धृ॥
जन्मघेण्या जगजेठी आले कुंडलिनी काठी
उमटली पदकमले येथे या भूमीची ख्याती मोठी
वैजनाथांच्या तपाने तेज ल्याली जन्मभूमी ॥१॥
या भूमीने या जगाला दिधला स्वाध्याय मंत्र
भक्ती समजावून दिघले मूर्तिपूजेचेही तंत्र
पांडुरंगी कर्मयोगे दिव्य झाली जन्मभूमी ॥२॥
जागवी त्रिकाळ संध्या राम हृदयीं बैसला
क्रांतीचा विचार गीता कृष्ण जीवनीं गुंतला
माणसाला गौरवाचे स्थान देत जन्मभूमी ॥३॥
जेव्हा जेव्हा धर्माला येते ग्लानी भारती
तेव्हा तेव्हा अर्जुनाचा कृष्ण होतो सारथी
वैदिकांची वीरगाथा गर्जते ही जन्मभूमी ॥४॥
वाद आता कोणता हो या पुढे उरणार आहे,
प्राण ईश्वरवाद आता या जगीं भरणार आहे
पंचरंगी क्रांतीला विश्वात नेईल जन्मभूमी ॥५॥
या भूमीची माती पावन लावू या टिळा कपाळी
वाण हे आहे सतीचे आणूया जगती झळाळी
कार्य पांडुरंगी करण्या मार्गदर्शक जन्मभूमी ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP