भावगंगा - तू राम तू घन:श्याम
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
तुझे मी काय करू गुणगान तुझे मी काय करू घन:श्याम ॥धृ॥
नव निर्माता ब्रह्मदेव तू पालक, पोषक कमलेश्वर तू
संकट नाशक शिव तव नाम तू तर राम तू घन:श्याम ॥१॥
कोणी तुजला मानव म्हणती संत-ॠषींची पदवी देती
ईश्वर तू हृदयातिल राम तू तर राम तू घन:श्याम ॥२॥
प्रेम-रूप तव जग न ओळखी कार्य कळे तो उठवि पालखी
भक्तांचे तू अंतिम धाम तू तर राम तू घन:श्याम ॥३॥
तव सहवासे लाभ शांतीचा विसर मनाला निज दु:खाचा
तू सकलांचा आत्माराम तू तर राम तू घन:श्याम ॥४॥
याद सदा तव उपकाराची पूजा करतो पदकमलांची
वसो मुखीं तव एकच नाम तू तर राम तू घन:श्याम ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2023
TOP