भावगंगा - यात्रा आली रे आली
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
यात्रा आली रे आली, घेऊन श्याम (आली)
घेऊन आली श्याम ॥धृ॥
यात्रेच्या वाटेवर बुक्का गुलाल
पायात घुंगरू हातात टाळ
घेऊन हृदयात राम ॥१॥
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे
केशव माधव मुकुंद हरे
मुखीं हरीचे नाम ॥२॥
निघाले स्वाध्यायी बांधुन शिदोरी
भक्तीच्या मस्तीची चवच न्यारी
भक्ती करू निष्काम ॥३॥
हृदयात देव जसा पुष्पात गंध
यात्रिक नाचती होउन धुंद
करू प्रभुचे काम ॥४॥
देहाच्या मुरलीत गीतेचा वारा
कर्माच्या वीणेला भक्तीच्या तारा
गाठू तीर्थाचे धाम ॥५॥
नाचती वैष्णव नाचे गोविंद
‘जीवीचा जीवनु’ पाहु पांडुरंग
तोचि जिवा विश्राम ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP