भावगंगा - हसत रहा रे
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
हसत रहा रे हसत रहा
प्रेम प्रभूचे पहा जरा
भाग्याने जे तुला लाभले
प्रभू प्रीतीचा तोच झरा ॥धृ॥
शोध प्रीती निर्व्याज सुखामधिं
घडवी जीवन तू दु:खामधिं
सुखात प्रभुला टाकु नको तू
दु:खात धरी रे धीर जरा ॥१॥
सदा नांदवी प्रीती विषमता
दोष प्रभूला कसला देता
समजावी सुख-दु:ख ऐक्यता
भाव दृष्टिमधली मधुरा ॥२॥
सुखात स्नेहा येते भरती
दुखात भावामधि विश्रान्ती
भाव भोग सुख-दु:खे देती
तो प्रसाद प्रभुचा मान पुरा ॥३॥
विपुल सुखामधि उणे न काही
उपास म्हणावा येता ‘नाही’
मागावे, मिळते प्रअभुकृपा ही
जाण त्यातले मर्म जरा ॥४॥
कसले बघसी काय वाढले
दृष्टिदोष ते फेक सानुले
देणारावर प्रेम कर भले
समाधान त्यातच चतुरा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 24, 2023
TOP