भावगंगा - स्वाध्यायींचा साथी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
स्वाध्यायींचा साथी अवघा योगेश्वर भगवान
योगेश्वर भगवान अवघा योगेश्वर भगवान ॥धृ॥
घेऊनि हातामध्ये काठी गाई चारितो यमुनाकाठी
दुर्बलतेला घालित पाठी योगेश्वर भगवान ॥१॥
इंद्राची हो जिरविली मस्ती गोपांची हो उडविली सुस्ती
बोटावर करि गिरिची वस्ती योगेश्वर भगवान ॥२॥
ज्ञाने भरली उद्धव-गीता विदुरा-घरची भक्ति चहाता
धर्मराजसम अद्भुत नेता योगेश्वर भगवान ॥३॥
गीता सांगे सव्यसाचिला आश्वासन परि मानवतेला
भिऊ नका रे संसाराला योगेश्वर भगवान ॥४॥
ओळख करतो मृत्यूसंगे अभंग श्रद्धा भजनी रंगे
गूढ जगाचे हळूच सांगे योगेश्वर भगवान ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 07, 2023
TOP