भावगंगा - पावन केले दादांनी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
दीप होऊनी मार्ग दाविला पावन केले दादांनी ॥धृ॥
जगलो होतो कसातरी अन् पडलो असतो कुठेतरी
गत जन्मीचे भाग्य उजळले म्हणून आलो येथवरी
सौरभहीन या फुलात आता सुगंध भरला दादांनी ॥१॥
क्रियाशून्य मी धोंडा होऊन पडलो होतो रस्त्यावरी
संतचरण लागता सहज ते जाणीव झाली मनी खरी
रस्त्यावरच्या या दगडाची मूर्ती घडविली दादांनी ॥२॥
संस्कृतीचे मूळ शोधूनी जगले होते ऋषी मुनी
तत्त्व गीतेचे उरी पचवूनी स्वतः राहिले गीता होऊनी
चुकलो होतो वाट जी घरची पुन्हा दाविली दादांनी ॥३॥
नाही कुणाचा नव्हे कशाचा ज्ञानदीप हा योगेश्वराचा
फाडुनी पडदा अंधाराचा प्रकाशयात्री झालो त्याचा
जय योगेश्वर मंत्र शुभंकर आम्हास शिकविला दादांनी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP