भावगंगा - प्रथमारंभी प्रणाम करतो
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
प्रथमारंभी प्रणाम करतो विघ्नेश्वर गणपते
तुझ्या दर्शने मांगल्याची ध्वजा सदा फडकते ॥धृ॥
सान जिवाला मान दिला तू मूषक तुझे वहान
दुर्वासम तृण आत्मीय केले घडे पुजेचा मन
रक्तवर्ण पुष्पांवर प्रीती क्रांतीवर तव ध्यान
सुखकर्ता दु:खहर्ता तुजला गणेश पडले नाम ॥१॥
मातृवंदना पितृवंदना तुझी कृती बोलते
प्रात्यक्षिक तव सद्वृत्तींचे प्रथम स्थान गाठते
कणभर नाही तुझ्याविना रे जगात शुभ काही
श्रुतिस्मृती लकारितो दैवी रात्रंदिन ग्वाही ॥२॥
गजासुराचा वध केला तू जगत्हिता साधिले
गजमस्तक स्वीकारुनि देवा भूत-भावि जाणिले
पूर्ण दंत श्रद्धेचा, अर्धा बुद्धीचा तुजकडे
तुझ्या भक्तिचे अखंड झडती चहूंकडे चौघडे ॥३॥
गणनायक तू प्रथम येउनी सायुध बैस घरीं
नकोत विघ्ने भरू जीवनीं कृपा एवढी करी
प्रसाद देई निर्भयतेचा, हिम्मत देई पुरी
तव भक्तीचे नंदनवन मी आणिन या भूवरी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 11, 2023
TOP