मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
निघाले दादांचे यात्रिक

भावगंगा - निघाले दादांचे यात्रिक

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


देव मस्तकी घेऊन करुया
जीवन हे सार्थक निघाले दादांचे यात्रिक ॥धृ॥
तीर्थस्थाने गढूळ झाली,
मांगल्याची कृती न उरली
भावफुलांना हळुच फुलवुनी,
करिती जीवन हे सात्विक ॥१॥
मंत्र गिरविती कृतिभक्तीचा,
भाव-अंतरी शुद्ध भक्तीचा,
ठेवा द्याया ॠषी मुनींचा,
चालले प्रेरक हितचिंतक ॥२॥
भगवंताला शिरी घेऊनी
गीता नेती घराघरातुनी,
गंगा वाहे मनामनातुनी,
असे हे तेजस्वी साधक ॥३॥
घराघरातून भाव निमाला,
स्नेह-गोडवा मुळी न उरला,
नाते दैवी जोडुन उठला,
हरीचा प्रेमळ हा पाईक ॥४॥
अग्रदूत हे धर्मक्रान्तीचे
साधक दैवी युगायुगांचे,
वारस हे तर ॠषीमुनींचे,
जयांचे दादा उद्धारक ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP