भावगंगा - चला औतास जुंपूया बैल
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
चला औतास जुंपूया बैल
गीता गात जाऊ दोन मैल ॥धृ॥
पिकवूया भक्तिचा मळा
मुक्तिचा कोंब कोवळा
श्रद्धेचा घेऊया कौल, गीता गात जाऊ दोन मैल ॥१॥
या, शेतकऱ्यांनो या
या, कामकऱ्यांनो या
जीवाचे जाणुनी मोल, गीता गात जाऊ दोन मैल ॥२॥
ते शब्द ऐकुनी कानी
बदलली आमुची वाणी
अपशब्द ठेवुनी पैल गीता गात जाऊ दोन मैल ॥३॥
गीता देते शक्ती अनमोल
करिं धराल सूर्याचा गोल
सावरुनी जीवन-तोल, गीता गात जाऊ दोन मैल ॥४॥
मातेस पाहिजे बाळ
गीतेस तुम्ही वेल्हाळ
सौख्याचा उठे कल्लोळ, गीता गात जाऊ दोन मैल ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP