भावगंगा - कलियुगीं चक्रपाणी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
हाक आम्हाला तार्यांची
साथ आम्हाला तार्यांची
चला जाऊया भक्तीफेरीला
आम्हा प्रेरणा दादांची ॥धृ॥
ही तर भूमी पंतांची
साधु, सज्जन, संतांची
कृति-भक्तीचा अर्थ जागवू
शीव सोडुनी गावांची ॥१॥
भूक भडकली भोगाची
करू या वृष्टी भावाची
गावोगावी जाउन आपण
कडी वाजवू दाराची ॥२॥
चिन्तनिकेतुन गीतेची
महती सांगू कृष्णाची
घरोघरीं जाउनिया देऊ
संथा त्रिकाल संध्येची ॥३॥
उले पाकळी सुमनांची
बोलू भाषा हृदयाची
डोलू आपण गावकऱ्यांसह
भजने गाता देवाची ॥४॥
ऋचा होउ या वेदांची
गवळण होऊ नाथांची
श्रीखंड्याच्या हातामधली
घागर होऊ भक्तीची ॥ ५ ॥
N/A
References : N/A
Last Updated : September 07, 2023
TOP