भावगंगा - गावोगावी खेडोपाडी
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
गावोगावी खेडोपाडी फिरतो स्वाध्यायी मेळा
घेऊन एकच शुभ डोळा ॥धृ॥
त्या सुकृतिचे नावहि सुन्दर सांगे भक्ती-फेरी
भक्त होऊनी नाते जोडा प्रभुशी पावनकारी ॥१॥
केवळ स्तुतिला कधी न भुलला जनक जगाचा स्वामी
त्याला दिसला, लाविली ज्याने निजशक्ती प्रभुकामी ॥२॥
अध्यात्मातिल कचरा काढा, भक्ती गाळुनी घ्याहो
संस्कृति-माता पहा, पहा ही फोडित आहे टाहो ॥३॥
नागर-खेडुत भेट सुमंगल या हो सगळे जवळी
एक अमोलिक भ्रातृत्वाचे नाते जीवन उजळी ॥४॥
पिता प्रभू, सन्तान सकल जग, नाते तोडिल भेद
आत्मविकासी मानव बनतो विसरुन सगळे खेद ॥५॥
व्यक्ती, राष्ट्र वा समाज सगळा भेदातित होण्याला
प्रेम उबारा, विचार वैदिक, मूर्ती हवी पूजेला ॥६॥
निर्हेतुक, निस्वार्थभावना, कार्यावरची प्रीती
परस्परांचे सौख्य राखणे, भक्तिफेरिची रीती ॥७॥
विचार प्रभुचे, प्रभुचे चिन्तन, प्रभुमय जीवन व्हावे
केवळ इतका भाव जपूनी भक्तिफेरिला यावे ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP