भावगंगा - माणसा! पवित्र होशिल का ?
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
क्षेत्रामधल्या स्नानाने तू निर्मळ होशिल का?
माणसा ! पवित्र होशिल का ? ॥धृ॥
पुण्य जलामधिं मत्स्य पोहतो
त्या पाण्यातच पशू डुंबतो
तूहि यात्रिका त्यात न्हाउनी धार्मिक होशिल का ? ॥१॥
वारा पिउनी सर्प राहतो
पर्णे खाउन मेंढा जगतो
ध्यान बकापरि धरुन दांभिका ! योगी होशिल का ? ॥२॥
माळ जपाची नित्य फिरवितोस्
मनीं वासना, विकार जपतोस्
निलाजऱ्या तू पशुत्व पोसुन साधक होशिल का? ॥३॥
गीता ज्ञानेश्वरी वाचतोस्
कथा, भागवत नित्य सांगतोस्
उरीं अहंता जपून वेड्या? ज्ञानी होशिल का? ॥४॥
देवासाठी दुःख उचलतो
झिजता झिजता पवित्र होतो
जीव आवडे असा शिवाला; शंकर होशिल का ? ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 02, 2023
TOP