भावगंगा - सांगे योगेश्वर
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
माझा योगेश्वर-है- माझा योगेश्वर
चराचराचा सर्व सृष्टीचा सर्वेसर्वेश्वर ॥धृ॥
'मी असतां का चिंता करतो'
आश्वासन हे भक्ता देतो
'योगक्षेमं वहाम्यहम्' हे सांगे योगेश्वर ॥१॥
कर्मामधली दृष्टी देतो
श्रमिकांना तो योगी करतो
'योगः कर्मसु कौशलम्' हे सांगे योगेश्वर ॥२॥
काया वाचा मने शुद्धता
स्त्री वैश्यादिक असो शापिता
'तेऽपि यान्ति परां गतिम्' हे सांगे योगेश्वर ॥३॥
अनन्य भावे भक्ती करतो
भक्तीफेरिला नियमित जातो
'न मे भक्तः प्रणश्यति' हे सांगे योगेश्वर ॥४॥
प्रयत्नवादी रहा मनुष्या
ज्ञानभक्तिच्या वाढव कक्षा
'तस्मात् योगी भवार्जुन' हे सांगे योगेश्वर ॥५॥
जीवन म्हणजे युद्धच केवळ
नसता पाठिशी संख्याबळ
'माम् अनुस्मर युध्य च' हे सांगे योगेश्वर ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP