मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
उठतील चार रेषा वार्‍यावरी...

सदानंद डबीर - उठतील चार रेषा वार्‍यावरी...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


उठतील चार रेषा वार्‍यावरी धुराच्या
विझल्यावरी चिता, तू स्मरणात ना कुणाच्या !

कैसा तुरुंग आहे... ? नाहीत शृंखलाही !
हा जीव बांधलेला धाग्यात रेशमाच्या

येणे - निघून जाणे...आहे निरर्थ जगणे
तेही न ठेवलेले हातात माणसाच्या !

शहरात पावसाने थैमान घातलेले...
पाण्यावरी कहाण्या उद्ध्वस्त जीवनाच्या...!

डोळे पुसून हसतो मीही कधी असा की -
यें ऊन्ह श्रावणाचे दारात पावसाच्या !

N/A

References : N/A
Last Updated : July 26, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP