मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
आई मला जग सारं पहायचं होत...

आनंद पेंढारकर - आई मला जग सारं पहायचं होत...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


आई मला जग सारं पहायचं होतं गं !
तुझ्यासोबत चार क्षण राहायचं होता गं !

सतरंजीवर विरलेल्या खेळले असते खूप खूप
दुधात मिसळलेलं पाणीही प्यायले असते गुपचूप
अंगाईगीत तुझ्या सुरात ऐकायचं होतं गं !
आई मला जग सारं पहायचं होतं गं !

प्रत्येकवर्षी वर्गात पहिली असते आले
घरकामातही तुझा हात असते झाले
तुझ्या कुशीतून रोज सकाळी उगवाय्चं होतं गं !
आई मला जग सारं पहायचं होतं गं !

वेणीफणी, आंघोळ केली असती माझी मीच
स्नो, पावडर, टिकली नसती मागितली कधीच
तुझ्यासारखं सोज्वळ दिसायचं होतं गं !
आई मला जग सारं पहायचं होतं गं !

दादासारखे कष्ट घरासाठी असते केले
लग्न करून, तुला सोडून दूर नसते गेले
बाबांसारखं घर पाठीवर वाहायचं होतं गं !
आई मला जग सारं पहायचं होतं गं !

नसते शोधले वृद्धाश्रम तुमच्यासाठी
म्हातारपणाची तुमच्या झाले असते काठी
सुरकुतल्या हातांना कुरवाळायचं होतं गं !
आई मला जग सारं पहायचं होतं गं !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP