शांती सुमन - अपुलेपण माझ्यात रुजवते सा...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
अपुलेपण माझ्यात रुजवते
सांज - सकाळी हे माझे घर
सूर्य उगवता, खिडक्यांमधुनी
प्रकाश येई घरात सगळ्या
प्रकाशमय त्या पडद्यामधुनी
चमकतात खिडकीच्या जाळ्या
चिवचिव चिमणासा, इवलासा
कोमल झरतो कुठलासा स्वर
एक हसू अंगणी उमलते
आणि पसरते आकाशावर !
जणू मनीच्या सगळ्या गोष्टी
लिहिल्या कुणी उजळ भिंतींवर
प्रेम हेच सर्वस्व जीवनी
मात कई ते भय - भीतीवर
हाताने आशीर्वच देई
दारात उभी वत्सल आई
तात किती हे प्रेमळ माझे
त्या प्रेमाला तुलना नाही
परकेपणाला इथे न थारा
निखळ एक आनंदच मनभर !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP