श्रीराम दाते - सोनपाउले तुझी उमटता घर सग...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
सोनपाउले तुझी उमटता
घर सगळे हे उजळुन गेले
कौलारु, साधेच तरीही
तुझ्यामुळे अतिसुंदर झाले
या जमिनीवर जेव्हा जेव्हा
हात तुझा सुकोमल फिरला
वेल फुलांची नक्षिदार जणू
जसा रुजामा मउ अंथरला!
असे सुगंधी तुझे हात की
जमीन झाली बाग फुलांची
सहज तुझ्या मग हालचालिने
लहर पसरली आनंदाची
सोन्याची हि अशी पाउले
घरोघरी रोजच उमटावी
सांज-सकाळी प्रसन्नतेने
घरे स्वरांनी भरुन जावी
मृदु शब्दांची, मितभाषेची
सात्त्विकतेची साथ घराला
घराघरामधि अशी लक्ष्मी
सुंदरपण सगळ्या भवताला
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP