अमोल कोरडे - तुझ्या अनोळखी गावी आलो तर...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुझ्या अनोळखी गावी आलो
तरी सगळंच परिचयाचं वाटत आहे
ही माती तुझ्या पाउलखुणा दाखवत आहे
ही हवा तुझा स्पर्श घेऊन आल्याचं जाणवत आहे
का कुणास ठाऊक,
वाटत आहे मला...
की या गुरांच्या गळ्यातल्या घुंगरांचा नाद
कधी तुझ्याही कानी पडला असेल...
ही राघूनं मैनेला घातलेली आर्त साद
कधी तुलाही बेचैन करून गेली असेल...
या उंच उडणार्या पक्ष्यावर
आज तुझीही नर रोखलेली असेल...
अनोळखी तुझं गाव
तरी सगळंच परिचयाचं वाटतं आहे !
या हवेत तुझा गंध आहे
मग कसं म्हणू
तुझं गाव मला अनोळखी आहे !
N/A
References : N/A
Last Updated : May 14, 2017
TOP