मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
मला हे कळेना, मला ते कळेन...

डॉ. दिलीप पां. कुलकर्णी - मला हे कळेना, मला ते कळेन...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


मला हे कळेना, मला ते कळेना !
कुठे संभ्रमांचे विधाते ? कळेना !

युवा टाळती सैनिकी, शेतकीही
उद्या कोण देशास त्राते ? कळेना !

स्वतःचे कसे गोडवे संस्कृती ही -
- विदेशीय चालीत गाते ? कळेना !

चिणे माय गर्भाशयी स्त्री -भ्रुणा हे -
- असे कोणते रक्तनाते ? कळेना !

कसे हे ? पिले पाळण्यांच्या घरी अन्‍
वयस्काश्रमी जन्मदाते ? कळेना !

मनी बी न घालूनही पीठ सांडे
दळे का स्वतःलाच जाते ? कळेना !

मला पोसणारे कसे चक्क माझ्या -
- क्षयाचे निघाले चहाते ? कळेना !

गमे, नेक हाती पडो अर्ज माझा
परी कोण ना लाच खाते ? कळेना !

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP