शमशेर बहादूर सिंह - माझ्यापाशी दाम नसे प्रेम ...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
माझ्यापाशी दाम नसे
प्रेम तरीही करतो मी
मला रंग वा रूप नसे
प्रेम तरीही करतो मी
जगताचे मज कुठले ज्ञान
प्रेम तरीही करतो मी
बळ न तारुण्याचा अभिमान
प्रेम तरीही करतो मी
मी न कलापारंगत, न प्रवीण
प्रेम तरीही करतो मी
मी तर भावुक, दीन, मलीन
प्रेम तरीही करतो मी
मी केले कित्येक उपाय
करू न शकलो प्रेमत्याग पण
जीव सर्व परी असहाय
करू न शकलो प्रेमत्याग पण
सगळे केले...जप, तप मौन
करू न शकलो प्रेमत्याग पण
किती हिंडलो...देश - विदेश
करू न शकलो प्रेमत्याग पण
तर्हेतर्हेचे केले वेश
करू न शकलो प्रेमत्याग पण
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP