मीरा, बेळगाव - अबोध जाणीव किती नकळत स्वी...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
अबोध जाणीव
किती नकळत स्वीकारत जाते नाती !
अनेकदा नको असतानाच
दुसर्यानं आपलं होणं
आपण त्याचं असणं
आपोआपच घडत असतं
पण कधीतरी
ही अबोध जाणीव
खव्ळून उठते
फणा आपटत, क्रुद्ध नागिणीसारखी
वेटोळे घालत, लसलसत्या जिभांनी दंश करते
तेव्हा उघडतो
तो आतला कप्पा
नात्यांच्या गर्दीत
किती सोसले, किती भोगले
ह्याचं भान देण्यासाठी...
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP