प्रा. यशवंत माळी - सखी, तुझी, मडक्यात बंदिस्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
सखी,
तुझी, मडक्यात बंदिस्त थंडगार राख
किंवा
ओंजळभर अस्थी घेऊन
गंगार्पण करायला निघालो असेन मी
तेव्हा
माझाही सापळा आखडत चाललेला असेल
चालण्यात बळ नसलेला
त्यावर फक्त असेल
सुरकुतलेली कातडी
आणि
कशातच नसलेलं
भोवळलेलं मन
अधू डोळे
थरथरते हात...
पायाखाली मात्र
थारा न देणारी तापती वाळू
तेव्हासुद्धा माझे ओघळतील डोळे
तुझं प्रेम आठवून
किंवा
असंही होईल बहुदा
माझ्या जागी
तू असशील...एकटी
पांढरीफटक !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP