शुभदा कामथे - दैवाचे फ़िरले फ़ासे, होत्या...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
दैवाचे फ़िरले फ़ासे,
होत्याचे नव्हते झाले.
राजाची राणी होते,
राजाशिवाय जगणे आले.
जगणे चालू आहे,
जैसे पूर्वी होते.
पण आता जगण्यामध्ये,
पूर्वीचे भाव न उरले.
विरहाच्या जखमा भरणे,
काळाच्या हाती आहे.
पण मात त्यावरी करणे,
माझ्या हाती आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP