साहेबराव ठाणगे - झोपेत वाजले दार उठा सरदा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
झोपेत वाजले दार
उठा सरदार
बुलावा आला
निद्रेचे भांडे फुटे
काहिली उठे
कालवा झाला
हे कोण कोठुनी आले
जागवुन गेले
मोडली झोप
का कुणीच जागे नाही
कळेना काही
वाढला ताप
हे काय इथे चालले
कोण वोळले
समजले नाही
या कसल्या हाका येती
कवेशी घेती
दिशा या दाही
शोधून सांदी - कोपरे
पाहिले सारे
मिळेना काही
जर तिच्याच पदराखाली
जाग मज आली
दिसेना आई !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP