किरण दशमुखे - ज्यांचं केंद्रच स्थिर नाह...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ज्यांचं केंद्रच स्थिर नाही
ते वाढवू पाहतात आपला परिघ
अमिबानं केंद्र बदलत ठेवावं तसं
आपला आकार बदलत...
मी मात्र, माझ्या केंद्राशी ठाम जोडलेला;
परिघ विस्तारण्याची चिंता न करता
केंद्राशी बांधलेल्या त्रिज्येची नाळ
वाढविण्याच्या प्रयत्नात.
आपसूकच व्हावं लागतं
व्यास, जीवा अन् परिघालाही...
शेवटी कर्तृत्वाला सामावणारं वर्तुळ नसतं;
ते भेदून उरतं
परिघाबाहेरील वर्तुळाच्या प्रतलात
असीम स्वप्नांच्या उदयासाठी...
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP