संदीप सुभेदार - टिक टिक करते घडयाळ हाती व...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
टिक टिक करते घडयाळ हाती
वाट धावते पुढे
वेळ धावते वाटेपुढती
माणुस मागे पडे
घडयाळातले काटे असती
लहान- मध्यम-मोठे
या काटयांच्या मुळेच ठरतो
जगती आपण खोटे
कोणी असतो मागे-पुढती
कुणी मध्ये थांबला
जग म्हणते हे तयास वेडे
थांबे तो संपला
वेळ कुणाच्या हाती नसते
वेळ निसटती वाळू
घट्ट मुठीतुन गळून पडते
जरी किती आवळू
कोणावरती कितीक वेळा
येती आणिक जाती
सूर्य उगवतो, अस्ता जातो
कितीक होती माती
आयुष्याचे घडयाळ ऐसे
वेळ कुणा न कळते
उभी सावली डोईवरची
क्षणात सोडुन जाते
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP