प्रा. बी. एन. मोकाशी - कोणी नसे कुणाला, हुंकार द...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
कोणी नसे कुणाला, हुंकार देत आहे
वेड्या चकोर पक्ष्या, चंद्रमाच मूक आहे ॥धृ॥ नसे कुणाला..........
यावे सहप्रवासा, आज आस वेडी आहे
माझेच लोक माझ्या, पायात बेडी आहे ॥१॥ नसे कुणाला..........
मनीं वासना उदंड, मुखी अभंग आहे
आनंद जीवनाचा, फुलनाच भंग आहे. ॥२॥ नसे कुणाला..........
विश्वास संपलेला, लेमात स्वार्थ आहे.
करुना दयाघनाचा, आकाशी अंत आहे. ॥३॥ नसे कुणाला..........
संपून ग्रीष्मलाही, वाटे वसंत यावा
प्रेमात ओलाचिंब, रूद्राभिषेक व्हावा ॥४॥ नसे कुणाला..........
रंगात रंगलीका, पाण्यात कृष्ण गावा
माझ्या तुझ्या मनींचा, हेवा विरून जावा ॥५॥ नसे कुणाला..........
मी कोण स्पनवेडा, दारी तृषार्त यावे
द्यावा तया विसावा, देणे कृतार्थ व्हावे ॥६॥ नसे कुणाला..........
अनंतात काळ आहे, पृथ्वी विपुल आहे.
केंव्हातरी भकास, तिमीरांत सत्य आहे ॥७॥ नसे कुणाला..........
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP