शशी इनामदार - छान अक्षरातलं हिरव्या शाई...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
छान अक्षरातलं
हिरव्या शाईनं लिहिलेलं
मोजक्याच, सहज शब्दांचं
तुझं शुभेच्छापत्र आज हाती आलं
अन्
सोनचाफ्याच्या सुगंधानं भरलेलं
तुझं सात्विक, निर्मळ मन
माज्याभोवती रूंजी घालू लागलं
जणू फुलपाखरूच...
तू पत्रातून केलेल्या कौतुकाचा,
आपुलकीचा मनापासून स्वीकार!
आयुष्यात येणारी अशी पत्रं
असे शब्द जपून ठेवावेत
निवांत वेळ मिळेल तेव्हा वाचायला
मैत्रीच्या पुनःप्रत्ययासाठी
हा लिखित संवाद
सुरू ठेवायलाच हवा आपण
आजच्या ’स्मार्ट’ जीवनात
मोबाईल,सोशल मिडिया, व्हॅट्सअप ग्रुप
आणि तिथं घडणार्या
आव्हासी गाठी-भेटी, आभासी संभाषणं
हे सगळं तर आहेच
पण
त्या सगळ्यापेक्षाही
आजच्या तुझ्या
चारच ओळीच्याच का होईना
पत्राचं मोल
माझ्या मनात किती आहे
सांगता येणार नाही मला
N/A
References : N/A
Last Updated : March 20, 2018
TOP