अशोक बुरसे - उंच कडयाच्या माथ्यावरुन क...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
उंच कडयाच्या माथ्यावरुन
कोसळत असतो प्रवाह पाण्याचा
फेकीत फेकीत फेनिलशुभ्र तुषार
उमटवीत सात रंगांचं इंद्रधनू
खोल दरीत साठवलेलं पाणी
उचंबळत असतं
घेताना कुशीत
कोसळणारा प्रवाह
पसरवीत पसरवीत
पांढरेशुभ्र वलय तुषारांचे
तिथं होतो नादभंग
केवळ पाण्यावर पाण्याच्या होणार्या आघातानं
तरी कधी भंगत नाही
समाधी तिथल्या एकांताच्या शांततेची !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP