रामावतार त्यागी - जिवलग माझी सखी विचारी प्र...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
जिवलग माझी सखी विचारी प्रश्न मला
तुझे नि माझे आहे कुठले नाते ?
नाते असे शब्दांत सांगता येते का ?
व्यक्त कधी जर झाले तर ते नाते का ?
पण मिटून डोळे, सलज्जतेने ऐक जरा
फूल आणखी सुगंध यांचे जे नाते
तुझे नि माझे असेच आहे नाते
मी करतो प्रीती अन् ऐकवतो गाणे
मी जीवन; माझे सृजनाशी मैत्र पुराणे
समीप ये अन् ऐक, ऐक हळुवारपणे
विवाह आणि कुंकुम यांचे जे नाते
तुझे नि माझे तसेच आहे नाते
मी नवरंगी आशांचा गोफ जणू
मी बहुरंगी गाण्यांचे इंद्रधनू
काय आणखी ? उदास होऊ नकोस तू
विश्वास - समर्पण यांचे जे नाते
तुझे नि माझे तसेच आहे नाते
जिवलग माझी सखी विचारी प्रश्न मल
तुझे नि माझे आहे कुठले नाते ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP