मारुती कटकधोंड - तव्यावर टाकावी भाकर अन् व...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तव्यावर टाकावी भाकर
अन् विझावा चुलीतला जाळ
विहिरीत सोडावी घागर
अन् तिच्यात यावा गाळ
काट्याकुट्यांतून वेचावीत फ़ुले
अन् गुंफ़ताना तुटावी माळ
अंग मोडून करावी मेहनत
अन् नांगरताना मोडावा फ़ाळ
घाम गाळुन जमवावे धान्य
अन् चोरीचा यावा आळ
दोन - चार थेंबांनी यावे सुख
अन् दु:खाने जोडावी नाळ
करावे ते विपरीत घडते
अन् हे कसले उफ़राटे भाळ !
मी न पराभूत: पुन्हा उठेन...
अन् तेव्हा शरण येईल काळ !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP