मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
मुलाला असतं कुतूहल, बाबां...

हेमंत गोविंद जोगळेकर - मुलाला असतं कुतूहल, बाबां...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


मुलाला असतं कुतूहल, बाबांच्या पूर्वायुष्यातल्या
गोष्टींबद्दल
त्याला फ़ारशा माहीत नसलेल्या
बाबांना समजत नाही, नेमक काय सांगावं मुलाला
आणि काय सांगू नये,
त्याच्यावर योग्य तेच संस्कार होण्यासाठी.
मग ते सांगतात काही गोष्टी, विनोदी वाटाव्यात
अशा
ज्या निभावताना खरं तर ते असतात घाबरलेले.
सांगतत काही गोष्टी धीरोदात्तपणाच्या
ज्या खरं तर घडलेल्या असतात आपोआप
नसतात केलेल्या जाणीवपूर्वक.
ते सांगत नाहीत आयुष्याच्या कंटाळवाणेपणाच्या
गोष्टी,
मनात कसे उद्भवतात नकारात्मक विचार जगताना
आणि स्वत:पासूनही दडपून टाकलेल्या बीभत्स
गोष्टी.
मग सांगतात उत्साहानं त्यांच्या वडिलांबद्दल
जे कसे दाखवायचे त्यांना, गोष्टी वाचून
पुस्तकांतून
आणि हळहळतात त्यांना स्वत:ला तसं करायला वेळ न
झाल्याबद्दल.
आठवतं त्यांना त्यांच्या लहानपणचं ते बोधपर गोष्टींचं
पुस्तक
मुखपृष्ठावरच्या आणि आतल्या चित्रांसकट.
पण सांगत नाहीत मुलाला
मनातून डोकं वर काढणारी आठवण...
त्यांच्या बाबांनी त्यांना नव्हती दाखवली वाचून
त्यातली ’माकडीण आणि तिच्या पिलाची गोष्ट’
तरीही जाता जात नाही त्यांच्या डोळ्यांसमोरून
त्याखालचं अजूनही भयावह वाटणारं चित्र !

N/A

References :
९४२३५८२५६५
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP