अंजली काळे - येणार्या प्रत्येक क्षणाच...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
येणार्या प्रत्येक क्षणाचं
करावं मनापासून स्वागत
प्रत्येक क्षण येत असतो
काहीतरी मागत !
प्रत्येक क्षणाचं आपणहून
द्यावं आपण देणं
क्षण प्रत्येक घेऊन येतो
नित्य नवं गाणं !
क्षणाच्या उत्सुक डोळ्यांतली
वाचता यावी अपेक्षा
वाटलं पाहिजे त्यालाही
त्याचीच होती प्रतीक्षा !
क्षणाची अंगभूत लय
अचूक पकडता यावी
त्याच सुरातली बंदिश
आपण पेश करावी !
कधीतरी चूक होईलही
नाही असं नाही
पण चुकीच्या भीतीनं नको
क्षण टाळायची घाई !
विन्मुख धाडू नये क्षणाला
कधीच कोणत्याही काळी
नेमकाच क्षण चुकला तर
जन्मभर पस्ताव्याची पाळी !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP