मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा ...

मंदार काळे - अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा उभा दारावर
आधी करावा सलाम, तेव्हा मियते मोटर !

अरे सेन्सॉर सेन्सॉर, म्होटा कधी म्हणू नही
अरे उदाच्या काडीला, सोटा कधी म्हणू नही !

अरे सेन्सॉर सेन्सॉर, नाही सोचनंबिचनं
येड्या पायातली व्हान, म्हणू नको रे तोरन !

अरे सेन्सॉर सेन्सॉर, जसा कारल्याचा येल
एक खुळं म्हणं गोड, बाकी सार्‍याले अकाल !

अरे सेन्सॉर सेन्सॉर, ,म्हणू नको रे बहावा
त्याले नही पान-फूल, वाजि ’ होय बा ’चा पावा !

देखा सेन्सॉर सेन्सॉर, शेंग वरतून काटे
अरे वरतून काटे, मधी मठ्ठ सागरगोटे !


ऐखा सेन्सॉर सेन्सॉर, निर्‍हा पदाचा इचार
देते खोट्याले होकार अन्‍ खर्‍याले नकार

देखा सेन्सॉर सेन्सॉर, म्हनं फिल्लम सुधार
आधी अक्कल उधार, त्यात पदाचा तेगार !

अरे सेन्सॉर सेन्सॉर, वरी मोठा जादुगार
याच्या पदाचा मालक; त्याच्यापुढी हे लाचार !

असा सेन्सॉर सेन्सॉर, आधी ’ देवाचा ’चा इचार
मर्जी माझी तू सांभाळ, तुवा मिळंल ’ मोकार ’ !

- बहिराभाई पायधरी

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP