मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
सतत कामात गढलेले हात अन्‍...

विजया ओगले - सतत कामात गढलेले हात अन्‍...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


सतत कामात गढलेले हात
अन्‍ वाचनात बुडालेल्या डोळ्यांना
काळानं अट घातली वयाची !

निमूटपणे तिनं ती मानली
ठरवलं, विश्रांती द्यायची
थकल्या गात्रांना

अवघड वाटलं, तरी द्यायची!

मनाचा लंबक
गतकाळाकडे झुकता
वर्तमानात थबकतो क्षणभरच
म्हणते ती कातरवेळी फोनवर
’मी मोकळीच; पण तू कामाची....’

लेक गलबलून जाते, म्हणते: ’छे गं....
वाटच पहात होते मी
तुझ्या फोनची

मग उत्साहानं
सांगत राहते कांहीबाही

कडा उसवते एकलेपणाची

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP