मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
कसे आणि किती शोधावेत संदर...

प्रा. संजयकुमार बामणीकर - कसे आणि किती शोधावेत संदर...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


कसे आणि किती शोधावेत
संदर्भ दु:खाचे ?
जाणिवांच्या खोल तळाशी...
किती करीत जावे उत्खनन,
वेदनांच्या गूढ अवशेषांचे ...?
तसे मिळत राहतीलही,
प्राचीन आदिबंध
मोहेंदोदारोच्या कबंधांसारखे...
आणि जुळत जाईल नाळ,
त्यांच्या - माझ्या समान दु:खाची...
आजच्या माझ्या
समान दु:खाला
नक्कीच असावा एक गूढ इतिहास,
आणि अश्मयुगाचे समांतर टप्पे
मी शोधतच राहीन,
ते कालसंदर्भ अनिवार दु:खाचे...
कुठेतरी, कधीतरी,
जुळूनच येतील संदर्भ दु:खाचे

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP