सुचित्रा पवार
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
उभं एक झाड उन्हानं रापलेलं
पाना फुलांनी थोडंसं झुकलेलं
उना-पावसानं खंगलेलं
फांदी फांदीवर किलबिल पाखरं
सावलीत विसावलेली गुरं-वासरं
असा सगळ्यांना त्या झाडाचा आधार
नव्हतं करत कुणीच पण त्याचा विचार
पण एक दिवस पाखरा-गुरांजवळ
झाड कुरकुरलं काहीशा रागानं
पण
खट्याळ पाखरं ढंग मस्तीत
अवखळ गुरं गुंग सुस्तीत
कुणीच त्यांचं ऐकलं नाही
दुरून वारा साद घालत आला
झाडाला म्हणाला, ’हस, खेळ, जरा’
मग पुन्हा सगळं विसरून
झाड गुरा-पाखरांना
निवारा देतच राहिलं
खंगून खंगून
पोकळ होतच राहिलं
आता कुणी त्याच्या जवळ
येईनासं झालं
पण हताश झाड
जुन्या खुणा जपतच राहिलं
एके दिवशी
सोसाट्याच्या वार्यानं
जुनं वैर साधलं
एका झपाट्यात झाड
कडकडत उन्मळून पडलं
आणि
अस्फुटसं पुटपुटलं :
’हीच प्रेमाची परतफेड ?’
N/A
References : N/A
Last Updated : December 09, 2017
TOP