संभाजी धावरे - सप्तपदी... तू रोजच चालतेस...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
सप्तपदी...
तू रोजच चालतेस
माझ्यासोबत
सप्तपदी
माझ्या सुखात
माझ्या दुःखात
माझ्या सर्वस्वात
माझ्या अंतरंगात
तूच असतेच माझ्या सोबत
पदोपदी
समजून घेतेस
प्रेम देतेस
रागावतेस...भांडतेससुद्धा
कधी कधी
पण जेव्हा
माझीच पावलं डगमगतात
वेडी - वाकडी पडतात
तेव्हा तूच मला सावरतेस
माझा आधार होतेस
मग असं वाटतं,
माझ्यासोबत तू नव्हे
तर तुझ्यासोबत मीच चालतोय
सप्तपदी !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP