डॉ. राम पंडित - कधी मी पुढं निघून जातो अन...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
कधी मी पुढं निघून जातो
अन् रस्ता मागं रहून जातो
तर कधी
रस्ता मला एखाद्या पडवावर
थकून रेंगाळताना पाहून
न सांगताच पुढं निघून गेलेला असतो
काही बिनचेहर्याचे
काही मुखवटा धारण केलेले
काही शिवलेल्या ओठांचे
तर काही बोलक्या डोळ्यंचे सहप्रवासी
एकेका वळणावर निखळतात
तो सोबत असल्याचं जाणवतं
पण लपून पाठलाग करणार्याप्रमाणे
तो दृष्टीस मात्र पडत नाही
अनोळखी चौरस्ते, अपरिचित वळणं
दिग्भ्रमित करणारे उत्तुंग चढाव
खोल उतार...निरंतर
धुकं, धूर, धुळीतलं मार्गक्रमण...
अवतीभवतीची दृश्यं अस्पष्ट होतात
नेमका एका चौरस्त्यवर
माझा रस्ता चुकतो
मूळ रस्ता पुढं निघून गेलेला असतो
अन्
थोडं दूर चालून जाताच
मी इच्छित स्थळी पोचतो
माझा प्रवास संपतो
मात्र
रस्ता दुरावतो पावलांना...
कायमचाच !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP