जयश्री चुरी - पावसाच्या पहिल्या धारा घे...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पावसाच्या पहिल्या धारा
घेऊन आला वारा
ओल्या मृदगंधाने भरला
धरतीचा गाभारा
मृदुंगावर धरणीच्या
तड तद वाजे ताशा
जलधारा वेचून घेती
भूदेवीच्या कळशा
जन्म घेती बीजांकुरे
भूमातेच्या कुशी
चहुकडे हरित तृणांची
दिसू लागली नक्षी
आनंदाने उंच भरारी
घेऊ लागले पक्षी
नभांगणी दिसू लागली
बक थव्यांची नक्षी
सुगरणीची होती पिल्ले
खोप्यामध्ये बसली
वार्यासंगे झोका झुलता
खुदू खुदू हसली
नांगर घेऊन खांद्यावर
गेला शेतकरी शेतात
झर झर फिरता नांगर
सरी शिरल्या मातीत
वर्षासरीना झेलून
तृप्त झाली धरा
अंगावर लेवून सजली
पाचूचा घागरा
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP