लहू चव्हाण - जगण्याचं चित्र रेखाटण्यास...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
जगण्याचं चित्र रेखाटण्यासाठी
कुंचला हाती घेतला...
कागद कोरा होता
तरी
उभ्या - आडव्या रेषांचा भास होतच राहिला
रंगसंगतीनं तर चित्राला कधीच साथ दिली नाही
कारण
ज्या कागदावर चित्रं रेखाटलं
त्या कागदानं रंग हवे तसे स्वत:त मुरवून घेतले नाहीत...ते फुटले !
मग कागदाची व रंगाची संगती आणण्यासाठी
एकांतात गेलो
उग्र भेसूर रंगानं तिथंही नाहेच घेतलं जमवून
वाटलं,
हे सगळं पेटवून द्यावं
आणि राखेच्या रंगानं रंगवावं चित्र
राखेचा रंग केला
चित्र रंगवलं
पण...
रंगाचा एक ठिपका बरंच काही सांगून गेला...
दुसर्याच्या चांगल्यासाठी जळणं हे
मरून जगण्यापेक्षा लाखपटींनी चांगलं !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP