मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
घडे हेच दररोज पश्चात माझ्...

प्रा. रुपेश देशमुख - घडे हेच दररोज पश्चात माझ्...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


घडे हेच दररोज पश्चात माझ्या
उन्हे पेरतो कोण रस्त्यात माझ्या ?

उगाळू नको तीच ती रडकथा तू
अता राहिले काय हातात माझ्या ?

कसा तोंड देऊ कळेना मलाही
उगवती किती प्रश्न देहात माझ्या !

कुठे भेटलो मी तुला, आठवेना -
तशी नोंद नाही हिशेबात माझ्या !

किती रोज अंधार आतूर होतो...
असे काय आहे उजेडात माझ्या ?

तुझी उत्तरे हाय खाऊन मेली...
नको तेच असणार प्रश्नात माझ्या !

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP