नंदकुमार शेंडगे - पत्र तर सगळेच लिहीतात मात...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पत्र तर सगळेच लिहीतात
मात्र मनातला कांही मजकूर
मनातच राहतो
कागदावर कांही उतरतच नाही
पत्र हे पत्रच असतं
फुलपाखरासारखं अलगद उडून जाणारं
ज्याच्या नावानं पाठवलंय
त्याच्यापर्यंत पोचणारं
त्याच्या ओंजळीत अलगद जाऊन बसनारं
डोळे टिपतात
पत्रातला मजकूर
एकादा अश्रू अक्षरांवर पडतो
आणि अक्षरं पुसट होतात
तरीही पत्र जपलं जातंच
अगदी शेवटापर्यंत......आपल्या
भविष्यकाळात पत्र फक्त ‘ आठवण ’ असतं
आपल्या भूतकाळाची
पत्र वाचून पुन्हा सुरक्षित ठेवलं जातं पत्र
हृदयाच्या कप्प्यात खोलवर
थोडा वेळ का होईना
‘ भूतकाळ ’ वर्तमानात येतो
आणि मनाला समाधान देऊन जातो
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP