ओंकार कुळकर्णी - आभाळ भरून दडे खास, अविरत ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आभाळ भरून दडे खास,
अविरत चुस्त टाई,
म्यांऊ शहर ओल्या पावली
करी एफर्टलेस क्राईम.
सुस्त डोळे, मग्न चाल
लॉंग लॉंग घोटाळा.
मऊ मऊ कॅलिको खाल,
जणू उन्हाळ्यात पावसाळा.
पर्रर्र पर्रर्र प्रसवणारा
श्वासाखाली मेट्रोताल.
उद्या नाही, आज - आत्ता
आहे त्रयस्थाचा काळ.
भिजलेल्या ह्या रस्त्यांवर
शहर नाही देत ओळख.
ह्या कानाची त्या कानाला
ना देख ना पाळख.
नदी नाले सारं काही
तरुन जाईल हा वहीम.
बिझी लाईनवर सुरु एय
रेनसॉंग विद राईम.
रेनसॉंगवर लपालपा
हे हातपाय मारतंय.
क्युरिऑसिटीत तुझं माझं
मांजर चिंब मरतंय.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP