रामनरेश पाठक - आज आहे चैत्रातली चांदणी र...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आज आहे
चैत्रातली चांदणी रात्र
आणि
माझ्या डोळ्यांसमोर
आहेस केवळ तूच
चांदण्यामुळं आकाश
काहीसं धूसर आहे
पौर्णिमेचं मंद माधुर्य
पसरलंय चहूकडं
तुझ्या हातात आहे
गुलाबाचें फूल
आणि
पहिल्यांदाच आली आहेस
तू माझ्यासमोर
कितीतरी वर्षांपूर्वी
गंगेच्या वालुकेवर
मी लिहिली होती काही गीतं
ती गीतंच वेचत वेचत
आली आहेस तू
...तर ये
तुझ्या त्या गुलाबी गीतांमध्ये
मला जायचं आहे विरून - विरघळून !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP