अरविंद खिरे - मज वाटे मजला कविता सोडुन ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मज वाटे मजला कविता सोडुन गेली
पण साद अचानक कानावरती आली
धावलो अनामिक गंधाच्या रोखाने
ती आम्रतरूच्या मोहरात लपलेली
जाऊन पोचला तेथे दिसली नाही
कुंजात फुलांच्या तेव्हा ती दडलेली
मी तिला शोधण्या कुंजवनीही फिरलो
ती मुरली होउन हरिअधरी बसलेली !
मग मीही झालो पंचम त्या मुरलीचा
ती श्रुती होउनी प्रसन्न थरथरलेली...
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP