रवींद्र मालुंजकर - आई जपते जपते घरभरलं गोकु...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आई जपते जपते
घरभरलं गोकुळ
तिच्या राबण्याने मिळे
गोद आनंदाचे फळ
आई असते असते
परिवाराचा आसरा
तिच्यामुळे उजळतो
सार्या घराचा कोपरा
आई रुजते रुजते
खोल खोल काळजात
तिच्या असीम त्यागाने
होई संकटांवर मात
आई आभाळ आभाळ
डोळां गच्च भरलेलं
सुखी ठेवाया संसार
सारं सारं रितं झालं
आई करते करते
उभ्या जगाचं कौतुक
राबताना दिन - रात
मानी जन्माचं सार्थक...
आई अभंग अभंग
तिची काय सांगू व्यथा ?
तिच्या नशिबी कष्टाची
सदा लिहिलेली गाथा
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP