सचिन लोंढे - तुझं बीज सुरक्षित पुरल्या...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुझं बीज सुरक्षित पुरल्यानंतर
तुझी मुळं पोचतात पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत
अन् फांद्यांना असते घाई
आभाळाला स्पर्श करण्याची
वादळात मोडत नाहीस
भूकंपात हादरत नाहीस
हलाहल पचवतोस सगळं
माथ्यावर चंद्र नसलातरी
दुष्काळात तुझा सांगाडा झाल्यावरही
पुन्हा हिरवे फुटण्याची ताकद
येतेच कुठून तुझ्यात
हाच विचार करतो मी....
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP